Showing posts with label Adulteration in Sugar and Method of Detection. Show all posts
Showing posts with label Adulteration in Sugar and Method of Detection. Show all posts

Tuesday, July 28, 2020

साखरेसारख्या गोड पदार्थातील भेसळ आणि ती ओळखण्याची चाचणी पद्धत

साखरेसारख्या गोड पदार्थातील भेसळ आणि
ती ओळखण्याची चाचणी पद्धत

चांगल्या प्रतीच्या अन्नधान्य आणि इतर मालाची गुणवत्ता कमी करणे म्हणजेच भेसळ. विक्री करावयाचा कोणताही उत्तम प्रतीचा माल (त्यात इतर पदार्थ मिसळून, किंवा त्यातील कार्यकारी घटक काढून) तो कनिष्ट प्रतीचा करून तो चांगल्या प्रतीचाच असल्याचे दर्शविणे, यास भेसळ करणे असे म्हणतात.

(Kindly Use Google Translator at the Extreme Right Top for Language Selection with Marathi  to English or desired Language.)

दैनदिन जीवनात आहारातील विविध अन्न पदार्थांना गोडवा देण्यासाठी सर्वात उपयुक्त घटक म्हणजे साखर. बाजारात साखर, गुळ, मध असे विविध गोडवा आणणारे घटक उपलब्ध आहेत. परंतु या सर्वांमध्ये हि आपणाला भेसळ आढळते. साखर हि दररोज वापरण्याजोगी वस्तू मानली जाते, परंतु तरीही आपल्याला मानवी सुरक्षेसाठी त्याची गुणवत्ता आणि भेसळ याची खात्री करावी लागेल. साखर आणि इतर गोडवा देणारे घटक मुख्यत: कन्फेक्शनरी (Confectionary) क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत.

अश्याप्रकारच्या भेसळयुक्त गोड पदार्थात रसायने टाकण्याची हि शक्यता असते. यामुळे शरीराला नानाविध अपायकारक विकार जसे कि, यकृताचे विकार, पोटदुखी, अन्नातून विषबाधा, उलट्या, डोकेदुखी, मळमळ उद्भवू शकतात. त्यामुळे आपणाला वेळीच भेसळ ओळखता आली पाहिजे, जेणेकरून आपले शरीर स्वस्थ राहील. सामान्यपणे गोडवा आणणाऱ्या पदार्थात खडू पावडर, धुण्याचा सोडा, पिवळा रंग, युरिया, पांढरी वाळू, दगड, मेटॅनिल अशा विविध घटकांची भेसळ केली जाते.  

यासाठी विश्वसनीय दर्जाची आणि चांगल्या गुणवत्तेचीच गोडवा आणणारी घटके अन्न पदार्थात वापरली पाहिजे. तर चला आता जाणून घेऊ, साखरेसारख्या गोडवा आणणाऱ्या घटकातील भेसळ आणि त्या तपासणीच्या काही चाचण्या.

भेसळ ओळखण्याची चाचणी पद्धत

. साखरेत खडू पावडरची किंवा चुऱ्याची भेसळ :


प्रामुख्याने खडू पावडरचा वापर साखरेचे वजन वाढवण्यासाठी आणि साखरेला चकाकी मिळवून देण्यासाठी भेसळयुक्त घटक म्हणून केला जातो. यासाठी थोडी साखर घेऊन ती एका काचेच्या ग्लासामध्ये विरघळण्यास ठेवावी. त्यात भेसळ नसेल तर शुध्द साखर आपणाला दिसेल परंतु खडू पावडरची भेसळ असल्यास साखर पाण्यात विरघळेल आणि खडूच्या चुर्याचा थर तळाशी दिसेल. अशाप्रकारच्या दीर्घकालीन वापराने श्वसनाचे विकारही उध्भवू शकतात.

. साखरेत पिवळसर रंगाची भेसळ:

साखरेचे द्रावण तयार करून त्यामधील ५ मी ली द्रावण टेस्टट्यूबमध्ये घ्यावे. त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब टाकावे. तयार मिश्रणाला गुलाबी रंग आला असता भेसळ आहे असे समजावे.

. साखरेत धुण्याच्या सोड्याची भेसळ:

हि भेसळ जाणून घेण्यासाठी एका टेस्टट्यूबमध्ये थोडी साखर घेऊन त्यावर तीन चार थेंब  हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. जर लगेच बुडबुडे आल्यास त्यामध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ आहे हे ओळखता येते.

. साखरेमध्ये सॅकरिन ची भेसळ:

सॅकरिन हि एक प्रकारची कृत्रिम साखर आहे. साखरेमध्ये सॅकरिन च्या पाण्याचा वापर केला असेल तर जिभेवर थोडा वेळ गोडपणा जाणवतो, परंतु शेवटी जिभेवर कडवटपणाची चव येते. कडवट चव आल्यास भेसळ आहे असे समजावे.

. साखरेसोबत सध्या गुळामध्येही भेसळ आढळते.

गुळाचा खप वाढवण्यासाठी त्यामध्ये मेटॅनिल या पिवळसर रंगाचा वपर केला जातो. हे ओळखण्यासाठी एका टेस्टट्यूबमध्ये थोडेसे गुळ घेऊन २ ते ५ मिली अल्कोहोल टाकावे. ते मिश्रण तयार झाल्यावर त्यात ८-१० थेंब हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. जर या मिश्रणाला गुलाबी रंग आला, तर त्यामध्ये मेटॅनिल हा पिवळसर रंग असल्याची खात्री होते.

. गुळामध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ:

यासाठी थोडे गुळ घेऊन त्यावर तीन चार थेंब  हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. जर लगेच बुडबुडे आल्यास त्यामध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ आहे हे ओळखता येते.

अशाच प्रकारे, गुळाला उचित रंगाचा मुलामा देण्यासाठी गंधकयुक्त झिंक फॉर्मलडीहाइड या रसायनाचा उपयोग केला जातो. परंतु याचे शारीवर अपायकारक परिणाम होऊ शकतात. हायड्रोक्लोरिक आम्लचा वापर करून हि भेसळ ओळखता येते.

. मधामध्ये साखरेची भेसळ :

या चाचणीसाठी एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावे. जर ते मध शुद्ध असेल तर पाण्यात विखुरले जाणार नाही. आणि, जर ते विखुरले गेले तर त्यामध्ये साखरेची भेसळ आहे असे समजावे.

. मधामध्ये गुळाच्या पाण्याची भेसळ:

अशाप्रकारची भेसळहि आपणाला ओळखता येते. यासाठी कापसाची वात मधात भिजवून ती पेटवली असता जर वात तडतडली तर त्यात भेसळ आहे असे समजावे. आणि जर वाट तेवत राहिली तर मध शुध्द प्रतीचे आहे हे ओळखता येते.

. शुध्द मधासाठी पेपर चाचणी :

यात मधाचे काही थेंब पेपर म्हणजेच कागदावर टाका आणि तो तसाच काही वेळ राहू द्या. मधाची गुणवत्ता चांगली असेल तर कागद भिजणार नाही कारण मधात पाण्याचा अंश अतिशय कमी असतो. पण भेसळ असेल तर कागद भिजेल.

१०. अल्युमिनिअमचा घातक वर्ख:

विविध प्रकारच्या मिठाईची पॅकिंग करण्यासाठी चांदीच्या खर्चिक अशा वर्खाऐवजी अल्युमिनिअमचा वर्ख मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

हे तपासण्यासाठी, हा वर्ख वेगळा करून मंद आचेवर ठेवावे. वर्ख चांदीचा असेल तर त्याचा बारीक असा गोळा बनतो. पण तो अलुमिनिअमचा असेल तर तो लागलीच जळून त्याची राख बनते आणि भेसळ झाल्याचे उघड होते.

मित्रांनो, अशाप्रकारे योग्य सावधनता बाळगल्याने आपण होणाऱ्या भेसळीपासून स्वतःला वाचवू शकतो.

डॉ. जाजू रामेश्वर

सहाय्यक प्राध्यापक,

      अन्नव्यवसाय व्यवस्थापन विभाग