मसाला पदार्थातील
भेसळ
(Kindly Use Google Translator at the Extreme Right Top for Language Selection with Marathi to English or the desired language.)
चांगल्या
प्रतीच्या अन्नधान्य आणि इतर मालाची गुणवत्ता कमी करणे म्हणजेच भेसळ. विक्री
करावयाचा कोणताही उत्तम प्रतीचा माल (त्यात इतर पदार्थ मिसळून, किंवा त्यातील
कार्यकारी घटक काढून) तो कनिष्ट प्रतीचा करून तो चांगल्या प्रतीचाच असल्याचे दर्शविणे, यास भेसळ करणे असे
म्हणतात.
मित्रहो, कोणत्याही अन्न पदार्थाला रुचकर, चविष्ठ बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मसाला. मसाल्याचे पदार्थ हे प्रामुख्याने अन्नाला चव, सुगंध, रंग आणि परिपूर्णता देण्यासाठी उपयुक्त आहेत. परंतु आजघडीला, मसाले देखील भेसळीच्या विळख्यात अडकलेले आहेत.
तर आज
आपण जाणून घेऊ विविध मसाल्याच्या पदार्थातील भेसळ आणि ते ओळखण्याची चाची पद्धत:
१. हिंगमध्ये बाह्य रेझिन (राळ) ची भेसळ:
थोडी
हिंग स्टेनलेस स्टीलच्या चमच्यात घेऊन आगीच्या संपर्कात न्या. शुध्द हिंग
कापरासारखी जळते. पण जर भेसळ असेल तर कापारच्या ज्योतीसारखी जळत नाही.
२. हिंगमध्ये स्टार्चची भेसळ:
थोड्याशा
हिंगमध्ये आयोडीनचे काही थेंब टाकले असता जर निळा रंग आला तर पदार्थात भेसळ आहे
असे समजावे.
३. हिंगमध्ये छोटे दगड किंवा इतर भेसळ:
यासाठी
थोडी हिंग आणि पाणी ग्लासात एकत्र करून त्यास हलवावे. जर त्यामध्ये छोटे डागर
किंवा जमिनिवरील इतर भेसळ असल्यास ते ग्लासच्या तळाशी जाइन आणि भेसळ असल्याचे
दिसेल.
४. काळीमिरी मध्ये पपईच्या बी ची भेसळ:
एका काचेच्या ग्लासात थोडी काळीमिरी घ्या. शुध्द काळीमिरी ग्लासात
तळाला जाईल. परंतु पपईची बी पाण्यामध्ये तरंगेल. यावरून भेसळ झाली आहे कि नाही
आपणाला लक्षात येते. तसेच, यासाठी अजून एका पद्धतीचाहि उपयोग केला जातो.
यामध्ये,
पांढऱ्या कागदावर काळीमिरी विखुरली घेऊन काचेच्या भिंगाने निरीक्षण करावे.
काळीमिरी हि तपकिरी रंगाची आणि सुरकुतलेला पृष्ठभागाची त्यातील चवीने आणि तीक्ष्ण
अश्या चवीने ओळखता येते. तर, पपईची बी हि अंडाकृती आकाराची आणि गुळगुळीत
पृष्ठभागाची असते.
५. काळीमिरी मध्ये हलक्या काळ्या रंगाच्या
बेर्रीची भेसळ :
काळीमिरी
मध्ये त्याच रंगाच्या दिसणाऱ्या पण वजनाने कमी काळ्या बेरीचा वापर केला जाते. अशा
बेरीला बोटाने थोडे दाबून पहा. भेसळ असलेल्या लगेच तुटतील पण काळीमिरी तुटणार
नाही.
६. काळीमिरी ला खनिज तेलाचा लेप:
काळीमिरीला
जर खनिज तेलाचा लेप दिला तर त्याला रॉकेल चा वास येतो. त्यावरून भेसळ आहे असे
समजते.
७. मिरची पावडरमध्ये कृत्रिम रंगाची भेसळ:
एका
ग्लासामध्ये थोडे पाणी घेऊन त्यावर मिरची पावडर टाका. त्यामध्ये कृत्रिम रंगाचा
वापर केला असल्यास तो रंग लगेच पाण्यामध्ये आपला रंग सोडू लागतो.
८. मिरची पावडरमध्ये धुळीची भेसळ:
यात एका
ग्लासमध्ये थोडी मिरची पावडर टाका. मिरची पावडर ग्लासाच्या तळाशी जाते. आणि जर
भेसळ असेल तर धूळ पाण्यावर तरंगते.
९. मिरची पावडर मध्ये लाकडाचा भुसा:
हि भेसळ
ओळखण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ही मिरची पावडर त्यावर पसरवळी
असता भुसा तरंगू लागतो.
१०. लवंग मधून तेल काढून घेणे:
बाजारातील
लवंग मधून तेल काढले असले तर अशा लवंगा कमी आकाराच्या आणि संकुचित स्वरूपाच्या
असतात. तसेच त्यामधून तीक्ष्णपणा असलेला उग्र वास हि येत नाही. यावरून शुध्द
लवंगाची प्रत ओळखता येते. तसेच, थोडे पाणी घेऊन त्यात लवंग सोडल्या असता शुध्द
लवंगा तळाशी जातील तर भेसळयुक्त पाण्यावर तरंगताना दिसतात.
११. मिठामध्ये खडूची भेसळ:
यासाठी
एक ग्लास पाण्यामध्ये चमचाभर मीठ घेऊन मिश्रण हलवून घ्यावे. त्यात भेसळ नसल्यास
मीठ पाण्यामध्ये विरघळून जाते. पण जर भेसळ असेल, तर खडूच्या चुऱ्यामुळे पूर्ण
मिश्रण पांढरे होते आणि भेसळ पाण्यात न मिसळता तळात दिसते.
१२. मोहरीमध्ये आर्जेमोन बीची
भेसळ:
मोहरीचे
थोडे बी एका परतीत घ्यावे. मोहरीचे बी हे स्पर्शाला गुळगुळीत असते आणि मधून पिवळसर
रंगाचे दिसते. तर आर्जेमोन बी हे टणक व काळ्या रंगाचे असून मधून
पांढर्या रंग दिसते. अशाप्रकारे हि भेसळ आपणास समजते.
१३.हळदमध्ये लेड
क्रोमेट ची भेसळ:
काचेच्या ग्लासमध्ये पूर्ण हळकुंड आणि थोडे
पाणी घ्यावे. ज्या द्रावणात लेड क्रोमेट ची भेसळ असेत तेथे रंग विखुरला जातो आणि
भेसळ ओळखली जाते.
१४. जीऱ्यामध्ये भेसळ:
साधारणपणे
गवत बीला कोळश्याची धूळ लावून त्याची भेसळ जीऱ्यामध्ये केली जाते. हे ओळखण्यासाठी
थोडे जिरे दोन्ही हातात घेऊन रगडले असता, जर हाताला काळा रंग आला तर तयार मिश्रणात
भेसळ आहे असे समजावे. तसेच जिऱ्याच्या दाण्यांवर बारीक रेघा असतात ज्या गवत बी वर
दिसत नाही.
१५.
संयुक्त मसाला घटकांमध्ये बाह्य पदार्थांची भेसळ: बाह्य पदार्थामध्ये प्रमुख्यान्ने धूळ,
छोटे दगड, पेंढ, तण, बियाणे, कीटक, खराब किंवा निकृष्ठ दर्जाचे धान्य यांची भेसळ
केली जाते.
हि भेसळ
ओळखण्यासाठी थोडे धान्य एका काचेच्या प्लेट मध्ये घेऊन त्यात अशुद्ध असणाऱ्या
धान्याचे सर्वेक्षण करावे. शुध्द अन्नधान्य मध्ये कसलीच विशुद्धी दिसत नाही. परंतु भेसळ केलेली असल्यास आपणाला ती उघड्या
डोळ्याने हि दिसते.
No comments:
Post a Comment